¡Sorpréndeme!

Chinchwad Bypoll: बंडखोरी का केली?, येऊन सांगा; सुनील शेळकेंचं कलाटेंना आव्हान

2023-02-10 2,492 Dailymotion

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि बंडखोर, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी थेट राहुल कलाटे यांना प्रश्न करत तुमचा अजेंडा काय आहे? तुम्ही बंडखोरी का केली? हे जनतेसमोर येऊन सांगावे, असं आव्हान दिलं आहे. तसेच, नुरा कुस्ती पहायची असेल आणि कोण सुपारी बहाद्दर आहे, हे बघायचे असल्यास तुम्ही समोर या त्याला उत्तर देण्याची आमच्यात ताकद असल्याचंही त्यांनी म्हटलं.