¡Sorpréndeme!

'तो निर्णय सर्वांना मान्य असेल'; चिंचवड-कसबा पोटनिवडणुकांवर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

2023-02-02 0 Dailymotion

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे. त्यापूर्वी पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत शरद पवार आणि जयंत पाटील यांनी काही आदेश दिले आहेत त्यानुसार आज पुण्यात बैठक घेत आहोत. आघाडीमधील कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवयाची याबाबत वरीष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल'