¡Sorpréndeme!

Pune Indrayani River Pollution: मुख्यमंत्री दखल घेणार का? वारकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

2023-01-28 0 Dailymotion

Pune Indrayani River Pollution: मुख्यमंत्री दखल घेणार का? वारकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

आळंदीत इंद्रायणी नदी ही वारकऱ्यांसाठी एक श्रद्धास्थान स्थान आहे. मात्र नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढवली आहे. एखादया बर्फाळ प्रदेशात ज्या प्रमाणे नदी असते तशीच अवस्था सध्या इंद्रायणीची झालेली आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरतो आहे. त्यात आता जल प्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात फेसच फेस दिसतो आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था झाल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर इंद्रायणी नदीचा फेसाळलेला व्हिडिओ व्हायरल होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने इंद्रायणी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. इंद्रायणी प्रदूषणावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळंदीत वारकऱ्यांनी दिला आहे.