¡Sorpréndeme!

Rishi Sunak यांनी घेतली Narendra Modi यांची बाजू; भर संसदेत पाकिस्तानी वंशाच्या खासदाराला सुनावले!

2023-01-20 1 Dailymotion

BBC नं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला एक माहितीपट अर्थात डॉक्युमेंटरी सध्या चर्चेत आली आहे. कारण यावरून भारतात सुरू झालेली चर्चा आता थेट ब्रिटिश संसदेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. हा माहितीपट म्हणजे मोदींविरोधातील अपप्रचाराचा एक भाग असल्याची भूमिका गुरुवारी केंद्र सरकारने मांडल्यानंतर त्यावर थेट ब्रिटनच्या संसदेमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश खासदाराने हा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यानंतर त्यावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मात्र मोदींची बाजू घेत या खासदारांनाच सुनावलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.