¡Sorpréndeme!

मराठी विश्व संमलेनाचे निमंत्रण नसल्याने Aaditya Thackeray नाराज, Uday Samant म्हणाले...

2023-01-04 698 Dailymotion

जगभरात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मराठी तितुका मेळवावा, असे या विश्व मराठी संमेलनाचे घोषवाक्य आहे. मात्र, राज्य सरकारने आम्हाला या संमेलनाचे निमंत्रणच न दिल्याचे सांगत आमदार आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. हे सरकार महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवणारे सरकार आहे. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवायच्या, अशी खोचक टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर आता शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

#aadityathackeray #eknathshinde #udaysamant #sanjayraut #mahavitaran #electricity #mseb #deepakkesarkar #prakashambedkar #uddhavthackeray #shivsena #dhanajaymunde #hwnews