¡Sorpréndeme!

'ठाकरे-आंबेडकरांच्या युतीने काही परिणाम होणार नाही'; Ramdas Athawale यांची प्रतिक्रिया

2023-01-02 0 Dailymotion

'राज्यात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सांगलीमध्ये आठवले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 'उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पक्षात जागा वाटपा मध्ये मतभेद होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही', असा टोलाही आठवले यांनी लगावला.