¡Sorpréndeme!

…तर भाजप शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का - संजय राऊत

2023-01-02 3 Dailymotion

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन १४४' राबवण्यात येणार आहे. यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर भाजप आपले १४४ आमदार निवडून आणणार असेल तर मग शिंदे गटाची लोकं धुणीभांडी करायला ठेवली आहेत का, असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #DevendraFadnavis #DeepakKesarkar #EknathShinde #BJP #Shivsena #Mission145 #AbdulSattar #AjitPawar #NCP #Politics #Maharashtra