¡Sorpréndeme!

पंतप्रधान मोदींनी दाखवला वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

2022-12-30 5 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. आईच्या निधानानंतर मोदी आज सकाळीच गांधीनगर येथील त्यांच्या घरी पोहचले होते. दरम्यान, आईच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर मोदींनी या दु:खात स्वत:ला सावरत तासाभरातच पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला.