¡Sorpréndeme!

कपबश्या टॉयलेटमध्ये धुण्याचा व्हिडीओ अन् Ajit Pawar भडकले , 'सरकारचं लक्ष कुठे आहे?'

2022-12-22 195 Dailymotion

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून सभागृहात सरकारला जाब विचारण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्याचवेळी विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलेल्या एका व्हिडीओमध्ये आज विधानसभेतलं वातावरण तापलं. या व्हिडीओमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. यावेळी “किती नालायकपणा कराल? कुठे हे पाप फेडाल? कशासाठी हा नालायकपणा चाललाय?” असे परखड सवाल अजित पवारांनी सभागृहात बोलताना उपस्थित केले.