संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. याविषयी बोलताना भाजपा नेते हार्दिक पटेल म्हणाले की, 'कामाच्या जोरावर भाजपाचे सरकार स्थापन होत आहे. गेल्या २० वर्षांत येथे एकही दंगल किंवा दहशतवादी हल्ला झाला नाही. भाजपने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या हे लोकांना माहीत आहे'