गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असं दिसत आहे. अशातच भाजप उमेदवार हार्दिक पटेलने निकालापूर्वी मोठी भविष्यवाणी केली आहे. १३५ ते १४५ जागा जिंकून गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे