¡Sorpréndeme!

Pune Half Marathon मधील २१ किमी स्पर्धेवर आर्मीतील जवानांची छाप

2022-11-27 46 Dailymotion

सकाळ माध्यम समूह आयोजित (Bajaj Allianz Pune Half Marathon 2022) बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (ता. २७) पार पडली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे ५.१५ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निशाण दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत दीपक रावत (Deepak Rawat) विजेता ठरला तर दीपक कुंभार यांना स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावता आला. दोघेही आर्मीत जवान असून ते बजाज अलायन्झ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर दोघांनी मेहनत फळाला आली, अशी प्रतिक्रिया देत आपल्या कामगिरीवरही समाधान व्यक्त केलं.