आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गणपती पुळ्यातील एका रिसॉर्टमध्ये ऑनलाईन माध्यमाद्वारे हॉटेलचे बुकींग करताना ही फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रमोद प्रभुलकर यांनी ही घटना नेमकी कशी घडली याबद्दल सांगितले आहे.