राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) निमंत्रण स्वीकारले आहे. आता हे दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी सांगितली आहे. ही यात्रा पुढील महिन्यात (नोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरें यांची मातोश्रीवर तर उद्धव ठाकरे यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण इथं भेट घेऊन भारत जोडो यात्रेचं निमंत्रण दिलं होतं.
#Shivsena #BharatjodoYatra #NCP #SharadPawar #RahulGandhi #UddhavThackeray #HWNewsMarathi