Ganesh Visarjan 2022: धनकवडीतील श्रद्धा आप्पासाहेब परांडे जनहित मंचातर्फे यंदा गणपती विसर्जनासाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. यंदा या मंचातर्फे थेट श्री क्षेत्र काशी येथील पवित्र गंगा नदीचे पाणी विधिवत पूजा करून आणलं आहे. टॅंकरद्वारे धनकवडी, आंबेगाव पठार परिसरातील नागरिकांना बाप्पाच्या विसर्जनासाठी हे पाणी देण्यात येणार आहे. तसेच २१ हजार श्री गंगा कमंडलू वाटप करण्यात येणार आहे.