¡Sorpréndeme!

Central Railway AC Local : प्रवाशांच्या उद्रेकानंतर मध्य रेल्वेच्या 10 एसी लोकल अखेर रद्द

2022-08-25 44 Dailymotion

मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांच्या तीव्र आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनानं अखेर नव्यानं सुरु केलेल्या १० एसी लोकल तात्पुरत्या रद्द केल्या. मध्य रेल्वे मार्गावर १९ ऑगस्टपासून १० एसी लोकल सुरु केल्या. त्याचा परिणाम सामान्य लोकल वाहतुकीवर झाला आणि त्यामुळे संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर सलग तीन दिवस आंदोलन केलं. आधी कळवा स्थानकातही आंदोलन झालं होतं. प्रवाशांच्या उद्रेकाची दखल घेत अखेर रेल्वे प्रशासनानं नव्यानं सुरु केलेल्या १० एसी लोकल तात्पुरत्या खंडित करण्याचा निर्णय घेतला. या एसी लोकलऐवजी आता सामान्य लोकल धावणार असल्यानं रेल्वे प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.