सध्या जगभरात वातावरण बदलामुळे उष्णेतेत वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील जलाशय कोरडे पडले आहेत. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एक नदी सुकल्यानं तिथं डायनोसॉरच्या पंजांचे ठसे आढळून आलेत. हे ठसे 11 करोड वर्ष असून 15 फुट लांबीचा आणि सुमारे 7 टन वजनाचा हा डायनोसॉर असेल असा अंदाज डायनोसॉर पार्कच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलाय.