¡Sorpréndeme!

Ajit Pawar at JJ Hospital:अजित पवार विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या भेटीला

2022-08-24 16 Dailymotion

मुंबईत काल विधानभवन परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. उस्मानाबादचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी काल आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन गंभीर असलेल्या शेतकऱ्याच्या प्रकृतीची चौकशी केली.