युक्रेन-रशिया युद्धाला ६ महिने पूर्ण होतायत. अशात भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी केंद्राने घ्यावी आणि भारतातच त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न होत होते. मात्र, नॅशनल मेडिकल कमिशननं भारतात अकॉमोडेट करण्यास नकार दिलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पुढं काय करायचं? हा प्रश्न निर्माण झालाय.