'चुकीला माफी नाही' असे म्हणत प्रदर्शित झालेला 'दगडी चाळ' या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या शुक्रवारी १९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'दगडी चाळ २' च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत या कलाकारांनी हजेरी लावत चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी या कलाकारांना मराठी चित्रपट, प्राईम टाइम आणि शो याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी फार स्पष्टपणे भाष्य केले.