केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. शिवसेना आमची आहे, याचे पुरावे कसले मागता?, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #SanjayRaut #ElectionCommission #EC #ShivSenaMP #MaharashtraPolitics #Rebel #Ayodhya #Maharashtra