अमेरिकी चलन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन असलेला रुपया प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. मंगळवारी 19 जुलै रोजी बाजार सुरु झाला तेव्हापासूनच रुपयाची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. काल भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80.05 रुपये प्रति डॉलर (Dollar) इतका झाला.