मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद हल्ली त्यांच्या निर्णयांपेक्षा एकूणच देहबोलीमुळे आणि त्या दोघांमधील वर्तणुकीमुळे कायम चर्चेत असते.
आजची पत्रकार परिषद पाहिली तर त्यातही एकनाथ शिंदेंना एमएमआरडीएचा विषय फडणवीसांनी सुचवल्याचं दिसलं. आणि मग त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढे माहिती सांगितली. आणि त्यावेळी बोलत असताना ते वारंवार फडणवीसांकडे पाहत होते आणि फडणवीसही ते बरोबरच बोलत असल्याचं आपल्या एकूण शैलीतून सांगितलं.