माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी आणि पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्जांच्या संबंधांमुळे नवा वाद निर्माण झालाय.. काँग्रेस पक्ष आयएसआयचा एजंट आहे का असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. भारताबद्दलची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप अन्सारी यांच्यावर होतोय. यावरुच भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधलाय.. भारत दौऱ्यात गुप्त माहिती गोळा करुन आयएसआयला दिल्याचा गौप्यस्फोट पत्रकार नुसरत मिर्जा यांनी केला होता.