राज्यभर पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे.. मात्र त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावच्या आरोग्य सेविकांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर राहू दिली नाहीये. मुसळधार पावसात जंगलातून ३-४ किलोमीटर पायी प्रवास करत या आरोग्य सेविकांनी लहान मुलांचं नियमित लसीकरण, कोरोना लसीकरण सुरू ठेवलेलें आहे. पावसाळ्यात जंगलातून मार्ग काढताना अनेकदा रस्ता वाहून गेलेला असतो. पुराचं पाणी जंगलात शिरलेलं असतं. धबधबे वाट अडवत असतात मात्र यातल्या कोणत्याही अडथळ्याची तमा न बाळगता या आरोग्य सेविकांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे.