सांगलीच्या आटपाडीत डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्य नगरीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची सांगता झालीय. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते... यावेळी शंकरराव खरात यांच्या संघर्षातून निर्माण झालेले साहित्य आणि त्यांच्या एकुण कार्याला उजाळा दिला...