¡Sorpréndeme!

Gadchiroi Rain : गडचिरोलीत पावसाचा कहर, पुराच्या पाण्यात ट्रक वाहून गेला, 3 प्रवाशांता मृत्यू

2022-07-10 37 Dailymotion

गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थितीही आहे. आलापल्लीहून भामरागडकडे जाणारा ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. प्रवासी घेऊन जाणाऱ्या या ट्रकच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. अहेरी तालुक्यातल्या पेरमिली गावाजवळच्या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी पुलावरून जात असल्यानं हा मार्ग बंद होता. पाणी थोडंसं ओसरल्याचं पाहून चालकानं ट्रक पुढे नेला. पण मध्येच लाकूड अडकल्यानं ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर शोधमोहीम राबवण्यात आली. त्यात ३ मृतदेह हाती लागले.