एकीकडे महागाईचा दर उच्चांक गाठत असताना आता पोटालाही चिमटा बसणार आहे... कारण अन्नधान्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. येत्या १८ जुलैपर्यंत याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.. आतापर्यंत फक्त अन्न धान्याच्या ब्रँडेड आणि पॅकिंग असलेल्या मालावर जीएसटी लागत होता. मात्र आता सरसकट सर्वच धान्यावर जीएसटी लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलाय.