¡Sorpréndeme!

Santosh Bangar शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली Inside Story..| Eknath Shinde| BJP

2022-07-04 187 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. बांगर यांच्या बंडखोरीनंतर आता शिंदे गटाकडे एकूण ४० आमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी गेल्यानंतर संतोष बांगर यांनी या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते. मात्र हेच बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, बांगर यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. याबद्दल आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? याबद्दल विधिमंडळात माहिती दिली आहे.

#DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #Maharashtra #BJP #MaharashtraAssembly #MaharashtraPolitics #HWNews