¡Sorpréndeme!

Thackeray vs Shinde : अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देण्याची शिंदे गटाची तयारी

2022-06-27 129 Dailymotion

Thackeray vs Shinde  :  शिवसेना आणि शिंदे गटाकडून आता कायदेशीर डावपेच आखले जातायत. शिंदे गटात गेलेल्या सात मंत्र्यांवर बरखास्तीची कारवाई केली जाणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल एबीपी माझावर तसा इशारा दिलाय. दुसरीकडे अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देण्याची तयारी शिंदे गटानं केलीय. एकीकडे शिवसेनेनं १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उपाध्यक्षांकडे याचिका दाखल केलीय.  दुसरीकडे अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देण्याची तयारी शिंदे गटानं केलीय. एकीकडे शिवसेनेनं १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उपाध्यक्षांकडे याचिका दाखल केलीय. त्यावरून आमदारांना सोमवारपर्यंत बाजू मांडण्याची नोटीसही बजावण्यात आलीय. तर उपाध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव आधीच दाखल असल्यानं त्यांना आमदारांवर कारवाई करण्याचे अधिकारच नाहीत, असा दावाही करण्यात येतोय. दोन्ही बाजूंकडून कायदेशीर डावपेच आखून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही सुरु आहे.