¡Sorpréndeme!

Maharashtra Rain : राज्यातील १८ जिल्ह्यात जूनच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

2022-06-18 39 Dailymotion

Maharashtra Rain : जून सरत आला तरी पावसाने म्हणावी तशी उपस्थिती लावली नाहीये. पेरण्या खोळंबल्यात, तलाव आटलेत, घामाच्या धारांनी चिंब होऊन नागरिक पाऊसधारांची वाट पाहतायत. आपल्या आयुष्यात ऊर्जादायी हिरवळ फुलवणाऱ्या वरुणराजाचा कोरडेपणा संपणार तरी कधी असाच प्रश्न सारेच विचारतायत. म्हणूनच प्रत्येकाच्या ओठी एकच वाक्य आहे, पाऊस यायच्याआधीच ओसरला की, यायला विसरला?