यंदाच्या आषाढी वारीदरम्यान वारीचा पोशिंदा अर्थात शेतकऱ्याची यशोगाथा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. फेसबुक दिंडीच्या टीमने या महत्त्वाच्या कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन वर्षात आलेल्या कोरोना संकटकाळात सगळं जग थांबलं होतं. मात्र, या काळातही शेतकऱ्यांनं घरात न बसता जगाच्या भेकेची सोय केली. त्यामुळे फेसबुक दिंडीने यंदा 'वारीचा पोशिंद्याचा जगभर प्रसार करण्याचा निर्धार केलाय. गेल्या बारा वर्षांपासून विविध सामाजिक विषय हाताळणाऱ्या या फेसबुक दिंडीच्या टीमशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.