कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाडमध्ये चोरट्यांनी तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. श्रीराम ज्वेलर्स आणि नवरत्न ज्वेलर्स या दुकानांची कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ज्वेलर्सची दुकानं फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तलवारी घेऊन चोरटे बिनधास्त फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय.