¡Sorpréndeme!

Sindhudurg : सिंधुदुर्गातल्या तिलारी नदीच्या खोऱ्यात सध्या पाच हत्तींच्या कळपाचा मुक्त संचार

2022-06-16 63 Dailymotion

Sindhudurg :  सिंधुदुर्गातल्या तिलारी नदीच्या खोऱ्यात सध्या पाच हत्तींच्या कळपाचा मुक्त संचार आहे... या हत्तींच्या वावराचा व्हिडीओ ग्रामस्थांनी मोबाईल कॅमेरात कैद केलाय... या हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ सध्या धास्तावलेयत. काही महिन्यांपूर्वी टस्कर हत्ती, मादी व त्यांची तीन पिल्ले असा एकूण पाच हत्तींचा कळप केर, मोर्ले गावात दाखल झाला होता आणि त्यांनी शेती, फळबागा, सुपारी, माड़ जमीनदोस्त करत शेतकऱ्यांचं  मोठ्या प्रमाणात नुकसान केले होतं. त्यामुळे वनविभागानं कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेय.