बारामतीमध्ये एग्रीकल्चर ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या शरद पवार इन्स्पायर्ड फेलोशिपचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगपती गौतम अदानी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.