Mumbai Rain : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... पावसाळा सुरु झाला असून मुंबईकरांना तब्येत सांभाळावी लागणार आहे. कारण गेल्या काही दिवसांत मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीय. गेल्या आठवडाभरात मुंबईत गॅस्ट्रो-मलेरियाच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झालीय. पालिकेच्या आकडेवारीनुसार १ ते ५ जूनदरम्यान गॅस्ट्रोचे ७८ रुग्ण होते, जी संख्या ६ ते १२ जून दरम्यान २०१ वर पोहोचलीय. त्याचप्रमाणे मलेरियाचे रुग्णही याच कालावधीत ५७ वरून १२७ वर पोहोचलेत. मुंबईतील वांद्रे, खार, कुर्ला, चेंबूर, धारावी, माटुंगा, वरळी, लोअर परळ आणि मालाडमध्ये गॅस्ट्रो-मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. थंडीताप आल्यास तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.