नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तीन दिवस जवळपास तीस तास चौकशी करण्यात आली. यावरुन राजकीय वातावरण तापलंय. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते देशव्यापी आंदोलन करणार आहेत. देशातील सर्व राजभवनावर काँग्रेस नेते मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते राजभवनाला घेराव घालणार आहेत. राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते रसत्यावर उतरले.