राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वाराणसीवरून आणलेल्या गंगाजलाने महाराष्ट्रातील 200 धार्मिक स्थळांना जलाभिषेक घालण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात कर्जत येथील गोदड महाराज मंदिरातून करण्यात आली. रोहित पवार काही दिवसांपूर्वी धार्मिक पर्यटन केले होते. त्यावेळी तेथील गंगाजलाने मतदारसंघातील तसेच राज्यातील धार्मिक स्थळांना जलाभिषेक करण्याचा मानस आमदार पवार यांनी केला होता.