महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना Hairy Cell Leukemia या रक्ताच्या कॅन्सरच्या एका प्रकाराने ग्रासलं आहे. असं वृत्त Free Press Journal कडून देण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यात दीनानाथ रूग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे. Hairy Cell Leukemia हा रक्ताचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे.