¡Sorpréndeme!

Maharashtra Board Class 12 Result 2022: 12 वी चा निकाल जाहीर, यंदा मुलींनी मारली बाजी

2022-08-18 1 Dailymotion

महाराष्ट्रात आज (8 जून) रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना संकटादरम्यान ऑनलाईन शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा राज्याचा निकाल 94.22 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.21 % लागला आहे. यंंदाच्या 12वी निकालामध्ये मुंबई विभागाची घसरगुंडी पहायला मिळाली आहे.