अभिनेते मॅथ्यू मॅककोनाघी यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये भावनिक भाषण केले.टेक्सासमधील उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत झालेल्या हत्याकांडानंतर बंदुकी संबंधी भावनिक आवाहन केले. मॅककोनाघी यांनी, 24 मे रोजी 19 मुले आणि दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर उवाल्डेला भेट देणारे आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेटलेल्या मॅककोनाघी यांनी मरण पावलेल्या मुलांबद्दल भाष्य केले. मॅथ्यू मॅककोनाघी यांनी सांगितले की, 10 वर्षांच्या अलिथिया रामिरेझने बनवलेले रंगीत रेखाचित्र प्रदर्शित केले, अलिथियाला पॅरिसमधील कला शाळेत जायचे होते, हे ऐकून श्रोते भावूक झाले होते.