¡Sorpréndeme!

Nupur Sharma Controversy: अरब देशातील कचराकुंड्यांवर मोदींचे फोटो का लावण्यात आले? | Sakal

2022-06-06 90 Dailymotion

भाजप नेत्या आणि प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की झाली. आखाती देशांमध्ये तर थेट कचराकुंड्यांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्यात आले. शिवाय, आखाती देशांमधील राजदूतांना समन्स बजावून भारत सरकारच्या भूमिकेची विचारणा करण्यात आली. तर इकडे आखाती देशांनी भारताविरोधात आक्रमक भूमिका घेताच भाजपनं आठवड्याभरानंतर नुपूर शर्मांची पक्षातून हकालपट्टी केली. पण हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.