छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर किल्ल्याच एक भौगोलिक वैशिष्ट्य देखील आहे. ते म्हणजे या किल्ल्यावरील टेकडीवर एकाच ठीकाणी सात वेगवेगळ्या रंगांची माती आढळते. पुण्यातील पर्यावरण आणि विज्ञान विषयातील अभ्यासकांनी या टेकडीच्या वैशिष्ट्यांची शोध सुरु केलाय...