¡Sorpréndeme!

बीड : भाजपा आमदारासह ग्रामस्थांनी ८ तास केले जल आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

2022-06-05 349 Dailymotion

बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी इथल्या गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेला वाळू उपसा बंद करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रात तब्बल आठ तास आंदोलन केले. भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील ग्रामस्थांसह आठ तास पाण्यात उभे राहून या आंदोलनात सहभाग घेतला होता. तर जिल्हाधिकारी देखील आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी नदी पात्रात उतरले. पाहुया हे जल आंदोलन.