भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आर्थिक वर्ष 2022 मधील मोठा निर्णय घेतला आहे. पीएफ वरील व्याजदर आणखी कमी होऊ नये यासाठी ईपीएफओ इक्विटी गुंतवणूकीची मर्यादा 15 टक्क्यावरुन 25 टक्के करणार आहे. ईपीएफओच्या वित्त गुंतवणूक समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाची महिन्याच्या अखेरीस बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.