दिल्ली उच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मास्क घालण्याच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. फ्लाइटमध्ये आणि विमानतळांवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनहित याचिकांवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, जे प्रवाशी नियमांचे पालन करत नाहीत त्यांना विमानतळ किंवा विमानातून बाहेर काढा.