¡Sorpréndeme!

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला कानपिचक्या

2022-05-14 327 Dailymotion

विमानतळावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना कानपिचक्या दिल्या. आमदार दिलीप मोहिते पाटलांनी आपल्या भाषणात चाकण, खेड परिसरात विमानतळ झालं असतं तर चाकण एमआयडीसीमध्ये आलिशान हॉटल्स असते, पण, ते विमानतळ आता बारामतीला गेलं, किमान आम्हाला डोमॅस्टिक विमानतळ द्यावं अशी विनंती अजित पवार यांना केली. हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ हे काय खेळण्यातील नाही की अजून एक द्या असं म्हणायला, त्याचा सर्व्हे करायला लागतो, उगाच बारामती, बारामती करू नका, असं म्हणत कानपिचक्या दिल्या.

#AjitPawar #dilipmohite #airports #pune