¡Sorpréndeme!

सांगली : अवघ्या दोन महिन्याच्या मेंढ्याची किंमत ३१ लाख रुपये; मंत्री एकनाथ शिंदेंनी केला सत्कार

2022-05-12 7 Dailymotion

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील माडग्याळ जातीच्या मेंढ्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. पोपटासारखी चोच असलेला हा मेंढा तब्बल ३१ लाखांचा आहे. आटपाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या राजा नावाच्या मेंढ्याचा सत्कार केला.