¡Sorpréndeme!

मुंबईत गदग-पुदुच्चेरी एक्स्प्रेसचा अपघात; लोकल सेवा विस्कळीत

2022-04-16 834 Dailymotion

दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला ‘सीएसएमटी’हून सुटलेल्या गदग एक्स्प्रेसने धडक दिल्याची घटना दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान शुक्रवारी रात्री घडली. या दुर्घटनेत पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले. या अपघातामुळे लोकल उशिराने धावत आहे. त्यामुळे आज शनिवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.