¡Sorpréndeme!

Vasant More meets Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भेटीनंतर १०० टक्के समाधानी, वसंत मोरेंचं स्पष्टीकरण

2022-04-11 714 Dailymotion

मशिदीबाहेरील भोंग्यांच्या राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत थेट माध्यमांशी बोलून नाराजी व्यक्त केल्याबद्दलही राज ठाकरेंनी वसंत मोरेंना जाब विचारल्याची माहिती मिळतेय. राज ठाकरेंच्या भेटीनंतर १०० टक्के समाधानी असून आपण मनसेतच राहणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्ट केलंय. कारण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे अडचणीत आल्याचं सांगितल्यानंतर मनसेकडून त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही मोरेंना पक्षप्रवेशाची ऑफर दिली. पण आता या ऑफर संपल्याचंही मोरेंनी शिवतीर्थाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलंय.
#rajthackeray, #vasantmore, #vasantmoretomeetrajthackeray, #mns, #mnsparty,